1974 मध्ये जन्मलेल्या अमीश यांनी कोलकात्यातून आयआयएम केलं. बोअरिंग बँकर ते प्रथितयश लेखक असा पल्ला त्यांनी गाठला. त्यांच्या लेखन कारकिर्दीची सुरवात दी इम्मॉर्टल्स ऑफ मेलुहा ने (शिव रचनात्रयीतील पहिले पुस्तक) झाली. या पुस्तकाने त्यांना अमाप प्रसिद्धी तर मिळवून दिलीच शिवाय वित्त सेवेतील आपल्या 14 वर्षांच्या कारकिर्दीपासून फारकत घेऊन पूर्णकाळ लेखनकार्यासाठी वाहून घेण्यास प्रोत्साहितही केलं. इतिहास, पुराण आणि तत्वज्ञानाबद्दल असलेल्या ओढ्यामुळे त्यांना जगातील विविध संस्कृती आणि धर्मातील सौंदर्य आणि अर्थ शोधण्यास प्रवृत्त केलं. अमीश यांच्या पुस्तकांच्या 4 दशलक्ष प्रती विकल्या गेल्या आहेत आणि जवळ जवळ 19 भाषांमध्ये त्यांचे अनुवाद झाले आहेत.
अमीश मुंबईत आपली पत्नी प्रीती आणि मुलगा नील यांच्यासमवेत रहातात.
www.authoramish.com
www.facebook.com/authoramish
www.twitter.com/authoramish
अमीश यांच्या राम चंद्र श्रृंखलेतील पहिल्या इक्ष्वाकुचे वंशज पुस्तकाचा मराठीत अनुवाद करणाऱ्या संध्या पेडणेकरांचं नाव मराठी आणि हिंदी अनुवाद क्षेत्रात सुपरिचित आहे. नऊ वर्षे त्या महाविद्यालयांत प्राध्यापिका होत्या. पुढे पत्रकारितेसह रेडिओ आणि दूरदर्शन इत्यादि माध्यमांसाठी त्यांनी उद्‌घोषिका, पटकथा लेखन, ललित लेखन आणि अनुवादाची कामे केली. मराठी आणि हिंदीतील वर्तमानपत्रे आणि नियतकालिकांतून काही काळ नियमीत स्तंभ लेखन केलं. हिंदी आणि मराठीतील नामांकित प्रकाशनसंस्थांतर्फे त्यांची 50हून अधिक अनुवादित पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. संध्या पूर्णवेळ लेखनकार्य. पती सतीश आणि मुलगा चिन्मयसमवेत दिल्लीत वास्तव्य.
sandhyaship@gmail.com