(वर्णक्रमानुसार)
अरिष्टानेमी
– मलयपुत्रांचा सेनापती. विश्वामित्रांचा उजवा हात.
अश्वपती
– ईशान्येकडील कैकय राज्याचा राजा. दशरथाचा निष्ठावान साथी. कैकयीचे पिता.
उर्मिला
– सीतेची लहान बहीण. जनकाची औरस पुत्री. पुढे यांचा लक्ष्मणाशी विवाह होतो.
कुंभकर्ण
– रावणाचा भाऊ. तो सुद्धा नाग जातीचा आहे. (जन्मतः व्यंग असलेला.)
कुशध्वज
– सांकश्यचा राजा. जनकाचा लहान भाऊ.
कैकयी
– कैकयचे राजा अश्वपती यांची कन्या. राजा दशरथाची दुसरी आणि प्रिय पत्नी. भरतची माता.
कौसल्या
– दक्षिण कोसल नरेश भानुमन आणि त्यांची पत्नी माहेश्वरी यांची मुलगी. दशरथ राजाची ज्येष्ठ पत्नी. रामाची माता.
जटायू
– मलयपुत्र जमातीचा म्होरक्या. सीता आणि राम यांचा नागा मित्र.
जनक
– मिथिलेचा राजा. सीता आणि उर्मिलेचे पिता.
दशरथ
– कोसलनरेश. चक्रवर्ती सम्राट. सप्त सिंधुंचा राजा. कौसल्या, सुमित्रा, कैकयी यांचा पती. राम, भरत, लक्ष्मण आणि शत्रुघ्नचे पिता.
नागा
– व्यंग घेऊन जन्माला आलेली मानव
नारद
– लोथलचा एक व्यापारी, हनुमानाचा मित्र
भरत
– रामाचा सावत्र भाऊ. दशरथ आणि कैकयी यांचा पुत्र.
मंथरा
– सप्तसिंधूतील सर्वात अधिक श्रीमंत व्यापारी. कैकयीचा निष्ठावान साथी.
मलयपुत्र
– सहावा विष्णू मानलेल्या भगवान परशुरामांचे वंशज.
मारा
– मारेकरी.
राधिका
– सीतेची मैत्रीण. हनुमानाची चुलत बहीण.
राम
– चार भावंडांपैकी थोरला. अयोध्येचा (कोसल देशाची राजधानी) राजा दशरथ आणि त्यांची ज्येष्ठ पत्नी कौसल्या यांचा पुत्र. पुढे सीतेशी यांचा विवाह होतो.
रावण
– लंकेचा राजा. विभीषण, शूर्पणखा आणि कुंभकर्णाचा भाऊ.
लक्ष्मण
– दशरथा-सुमित्रेच्या जुळ्या मुलांपैकी एक. रामाशी एकनिष्ठ. पुढे याचे उर्मिलेशी लग्न लागते.
वरूण रत्नाकर
– राधिकेचे वडील. वाल्मिकी जमातीचे प्रमुख.
वशिष्ठ
– अयोध्येचे राजगुरु आणि चारही राजपुत्रांचे शिक्षक.
वायुकेसरी
– हनुमानाचे वडील, राधिकेचे काका.
वायुपुत्र
– रुद्रावतारातील महादेवाचे वंशज.
वाली
– किष्किंधेचा राजा.
विभीषण
– रावणाचा सावत्र भाऊ.
विश्वामित्र
– मलयपुत्रांचा प्रमुख. सहावा विष्णू अवतार मानले गेलेल्या भगवान परशुरामांचे वंशज. राम-लक्ष्मणांचे अल्पकाळासाठीचे गुरु.
शत्रुघ्न
– लक्ष्मणाचा जुळा भाऊ. दशरथ आणि सुमित्रा यांचा पुत्र
शूर्पणखा
– रावणाची सावत्र बहीण.
समीची
– मिथिला नगरीचे नागरी आणि सुरक्षा प्रमुख.
सीता
– मिथिलेचा राजा जनक यांची दत्तक कन्या. मिथिलेची पंतप्रधान. पुढे रामबरोबर यांचा विवाह होतो.
सुनयना
– मिथिलेची राणी. सीता आणि उर्मिलेची आई.
सुमित्रा
– काशी नरेशांची कन्या. दशरथाची तिसरी पत्नी. लक्ष्मण आणि शत्रुघ्न या दोघा जुळ्या भावांची माता.
हनुमान
– राधिकेचा चुलत भाऊ. वायु केसरींचा मुलगा. नागा, वायुपुत्र जमातीचा सदस्य.