आभार
आपण जेव्हा लिहितो, तेव्हा कागदावर आपलं मन ओतून लिहीत असतो. यासाठी धाडसाची खूप गरज असते असं म्हणतात. असंही म्हणतात की, जेव्हा बरेच लोक एखाद्याच्या बाजूने उभे रहातात तेव्हा त्याच्यात असं साहस पैदा होतं. मला त्या सगळ्यांचे आभार मानायचे आहेत जे माझ्यासोबत नेहमी उभे ठाकतात. ते मला साहस देतात. मी एकटं नसल्याचं ते मला जाणवून देतात.
नील, माझा 8वर्षे वयाचा मुलगा. तो माझा अभिमान आहे आणि माझा आनंद आहे. या वयातही तो खूप वाचतो. तो माझी पुस्तकं वाचेल त्या वेळेची मी आतुरतेनं वाट पाहात आहे!
पत्नी प्रीती, बहीण भावना, मेहुणे हिमांशु, भाऊ अनीश आणि आशिश सगळ्यांचे - या कथेत योगदान दिल्याबद्दल. प्रत्येक प्रकरण लिहून झालं की ते वाचतात. तत्वज्ञानाच्या प्रकारांबद्दल मी त्यांच्याशी सखोल चर्चा करतो. या पुस्तकाचा बराचसा भाग मी अनीश आणि मीता यांच्या दिल्लीतील घरात लिहिला. मागल्या जन्मी मी नक्की काहीतरी सत्कृत्य केलं असावं आणि म्हणूनच मला असे नातेवाईक लाभले.
माझ्या कुटुंबातील इतरांचे – उषा, विनय, मीता, डोनेटा, शरनाज, स्मिता, अनुज, ऋता. माझ्यावरील त्यांच्या निरंतर विश्वास आणि प्रेमाबद्दल.
शर्वणी, माझी संपादिका. माझ्या कथांबद्दल जेवढा मी समर्पित आहे तेवढीच ती सुद्धा आहे. ती माझ्याइतकीच हट्टी आहे. मी खूप वाचतो तशीच ती सुद्धा खूप वाचते. तंत्रज्ञानाचं ज्ञान जेवढं तिला आहे तेवढंच मलासुद्धा आहे. मागल्या जन्मी आम्ही बहुतेक भाऊ-बहीण होतो!
माझे प्रकाशक वेस्टलँडमधील फँटास्टिक टीमचे – गौतम, कृष्णकुमार, नेहा, दीप्ती, सतीश, संघमित्रा, जयंती, सुधा, विपिन, श्रीवत्स, शत्रुघ्न, सरिता, अरुणिमा, राजू, संयोग, नवीन, जयशंकर, सतीश, दिव्या, मधु, सथ्या, श्रीधर, क्रिस्टिना, प्रीती आणि इतर. माझ्या विनम्र मतानुसार ते भारतातील सर्वोत्तम प्रकाशक आहेत.
अनुज, माझे एजंट, अगदी सुरवातीपासून ते माझे मित्रही आहेत आणि भागीदारही.
अभिजीत, एक सीनीयर कार्पोरेट एक्झीक्यूटीव आहे. माझा जुना मित्र. त्याने वेस्टलँडमध्येही काम केलं आहे. या पुस्तकाच्या विक्रीसाठी कराव्या लागलेल्या प्रयत्नांचं श्रेय याला जातं. अत्यंत तल्लख बुद्धीचा माणूस आहे!
मोहन आणि मेहुल हे दोघे माझे खाजगी मॅनेजर्स आहेत. मला लिहायला वेळ मिळावा यासाठी ते सगळं मॅनेज करतात.
अभिजीत, सोनाली, श्रुती, रॉय, कसांड्रा, जोशुआ, पुर्वा, नलिन, निवेदिता, नेहा आणि साइडवेजची टीम – एकुलती कंपनी जी बिझनेसच्या सर्व अंगांना रचनात्मकतेचा स्पर्श देऊन समृद्ध करतात. साइडवेजने माझ्या पुस्तकासाठी बिझनेस आणि मार्केटिंगची व्यूहरचना तयार करण्यासाठी मदत केली. त्यांनीच पुस्तकाच्या मुखपृष्ठासहित – आणि माझ्या मते मी पाहिलेलं ते एक सर्वोत्तम मुखपृष्ठ आहे - विपणनासाठी लागणारी बहुतेक सगळी साधनं तयार केली. अर्थातच्या जितेंद्र, देवल, जॉन्सन यांच्या टीमने मुखपृष्ठ तयार करण्यासाठी त्यांना मदत केली. ते खरोखर उत्तम डिझायनर्स आहेत.
मयंक, प्रियांका जैन, दीपिका, नरेश, विशाल, दानिश आणि मो’ज आर्ट टीमने या पुस्तकासाठी मीडिया आणि मार्केटिंगचे संबंध सांभाळण्याची जबाबदारी निभावली. अतिशय कणखर भागीदार आहेत ते. मी ज्यांच्यासोबत काम केलं त्यापैकी उत्तम एजंसी आहे ही.
हेमल, नेहा आणि ऑक्टोबझ टीमने या पुस्तकासाठी सोशल मीडियावरील बऱ्याच घडामोडी व्यवस्थित पार पाडण्यासाठी खूप मदत केली. ते परिश्रमी, हुशार आणि आपल्या कामासाठी समर्पित अहेत. कोणत्याही टीमचे मूल्यवान सहयोगी बनतील असे.
संस्कृत विद्वान मृणालिनी आणि वृषाली माझ्यासोबत शओधकार्य करतात. त्यांच्याशी होणाऱ्या चर्चा नेमी ज्ञानवर्धन करणाऱ्या असतात. त्यांच्याकडून मला चर्चेतून जे काही शिकायला मिळतं त्यातून मी बरेच सिद्धांत मांडतो जे नंतर पुस्तकात सामील होतात.
आणि शेवटी, पण अतिशय महत्वाचे, आपण वाचक. केवळ तुमच्यामुळे मला मी जसं जगतोय तसं जीवन जगणं, मला जे आवडतं ते करणं आणि त्यातून उपजीविका मिळवणं मला शक्य झालं. आपले आभार मानावे तेवढे थोडेच आहेत.