घाबरलेली, बावचळलेली समीची जंगलातील त्या छोट्या, उघड्या जागी उभी होती. अंधाऱ्या अमावस्येच्या त्या रात्री जंगलातील अनिष्टसूचक आवाजांमुळे वातावरण जास्तच भीतीदायक बनलं होतं.
गतकाळातील आठवणी आठवल्या. किती काळ... कित्येक वर्षे मध्ये लोटली होती. आपल्याला सारे विसरले असं तिला वाटत होतं. मला माझ्यासोबत सोडून दिलं सगळ्यांनी. शेवटी सप्त सिंधू प्रदेशातील मिथिला हे एक छोटं, नगण्य राज्य होतं. तरीही तिला याची अपेक्षा नव्हती. कृतज्ञतेच्या भावनेसोबत वर्तमानातील अस्वस्थ भावनांमुळे ती पुरती गोंधळून गेली होती.
तिचा डावा हात म्यानेतील तलवारीच्या मुठीवर होता.
‘समीची, काय म्हणालो ते तुला समजलं ना?’ तो माणूस म्हणाला. त्याचा दाणेदार आवाज वेगळाच होता. वर्षानुवर्षे तंबाखू आणि दारूच्या सेवनामुळे आणि प्रचंड ओरडण्यामुळे त्याच्या आवाजावर असा परिणाम झाला होता.
तो माणूस कुलीनांपैकी होता हे उघड होतं. त्यानं महागडे कपडे घातले होते आणि ते व्यवस्थित इस्त्री केलेले होते. नरम, व्यवस्थित विंचरलेले आणि पूर्ण पांढरे केस होते त्याचे. त्याच्या सर्व बोटांमध्ये विविध प्रकारच्या अंगठ्या होत्या. त्याच्या सुरी आणि तलवारीवर हिरे जडवलेले होते. त्याचं खोगीरही सोन्याचं पाणी देऊन सजवलेलं होतं. त्याच्या सुरकुतलेल्या कपाळावर मधोमध काळ्या रंगाचा, उभा टिळा लावलेला होता.
काळ्या गणवेषातील 20 सैनिकांची एक टोळी त्याच्यासोबत होती. सध्या ती अंधारात सामावून आसपास उभी होती. केवळ सरावलेली नजरच त्यांना टिपू शकली असती. सध्या त्यांच्या तलवारी म्यान होत्या. समीचीला घाबरण्याची गरज नाही हे त्यांना ठाऊक होतं.
दुसऱ्या दिवशी समीचीला साकंश्यला जाऊन गुरु विश्वामित्रांचं स्वागत करायचं होतं. खरं तर अचानक उद्भवलेलं हे साहसिक संकट पेलणं तिला प्रचंड जड जाणार होतं. निदान आत्ता हे घडायला नको होतं. तिने
सत्यदेवाची
प्रार्थना केली. कदाचित तो
अकंपनाला
मागे टाकेल.
‘पण, महाराज अकंपन...’ समीची अस्वस्थपणानं म्हणाली, ‘इराइवाच्या संदेशानुसार...’
‘आधी तुला जे जे सांगितलं होतं ते सगळं विसर,’ अकंपन म्हणाला, ‘आपली शपथ आठव.’
समीची ताठरली. म्हणाली, ‘मी आपली शपथ कधीही विसरणार नाही, महाराज अकंपन.’
‘नाही विसरलीस तर बरंच आहे.’ अकंपननं आपला हात उचलला आणि निर्विकार भावनेनं तो आपली नखं निरखू लागला. व्यवस्थित कापलेली, कडा घासलेली आणि रंगवलेली नखं होती त्याची. त्यांवर काळजीपूर्वक हलका धुवट रंग लावलेला होता. ‘तर..., सीताचं स्वयंवर होणार आहे...’
‘तुला पुन्हा पुन्हा तीच गोष्ट बोलायची गरज नाहीय,’ त्याला मध्येच तोडत समीची म्हणाली, ‘करेन मी, कारण, हे सीतेच्याही भल्यासाठीच आहे.’
अकंपन हसला. कदाचित या मठ्ठ स्त्रीच्या डोक्यात काहीतरी गेलं म्हणायचं. ‘होय तर!’ तो म्हणाला.
सीतेनं निःश्वास सोडला आणि हलकेच स्वतःच्या डोक्यावर चापटी मारत म्हटलं, ‘खुळीच आहे मी!’
स्वतःच्या खाजगी पूजा दालनात येऊन तिने एक सुरी उचलली. तो
अस्त्र पूजे
चा दिवस होता. शस्त्रास्त्रांची पूजा करण्याची ती एक प्राचीन परंपरा होती. आणि पूजेनंतर ती आपली सुरी गर्भगृहात, देवीच्या पायांजवळच विसरली होती. ती नेण्यासाठीच ती परतली होती.
सुदैवाने आज तिला शस्त्र वापरावं लागलं नव्हतं. श्रीमंत व्यापारी विजयच्या मनात मिथिलेपेक्षा सांकश्य निष्ठावान आहे, असंच तिला नेहमी वाटत आलं होतं. त्या दिवशी सकाळी बाजारात तिने जेव्हा चोरी करताना पकडल्या गेलेल्या एका छोट्या पोराला गर्दीच्या न्यायापासून वाचवण्याचा प्रयत्न केला होता तेव्हा त्यानं गर्दीला तिच्यावर हल्ला करण्यासाठी चिथावलं होतं.
समीची कुठे आहे?
संरक्षण दल आणि समारंभाच्या वर्तन नियमावली समितीचे प्रमुख कोणत्याही क्षणी येऊन पोहोचण्याची शक्यता होती. गुरु विश्वामित्र, त्यांच्यासोबत येणारे मलयपुत्र आणि हो, राम आणि लक्ष्मण यांचं स्वागत करून त्यांना समारंभस्थळी घेऊन येण्यासाठी ते गेले होते.
अचानक दरबानानं येऊन मलयपुत्रांचे सेनानायक अरिष्टानेमींच्या आगमनाची बातमी दिली.
सीतेनं उच्च स्वरात त्याला उत्तर दिलं, ‘त्यांना आदरपूर्वक आत घेऊन या.’
अरिष्टानेमी सीतेच्य दालनात आले. सीतेनं महर्षी विश्वामित्रांचा उजवा हात मानला जाणाऱ्या अरिषअटानेमींना आदराने हात जोडून आणि डोकं झुकवून नमस्कार केला. ती म्हणाली, ‘नमस्कार सेनानायक अरिष्टानेमी. मिथिलानगरीत आपणास कसलीही तसदी पडली नसेल अशी आशा करते.’
‘आपल्य घरात आपण नेहमीच आरामात असतो,’ अरिष्टानेमी हसत म्हणाले.
समीची त्यांच्यासोबत नाहीय हे पाहून सीतेला आश्चर्य वाटलं. हे रीतीला सोडून होतं. खरं तर समीचीनं या वरिष्ठ अधिकाऱ्याला आदरपूर्वक तिच्या दालनाच्या दारापर्यंत आणून सोडायला हवं होतं.
‘क्षमा करा, सेनानायक अरिष्टानेमी. खरं तर समीचीनं आपल्याला माझ्या दालनापर्यंत आणून पोहोचवायला हवं होतं. तिला नक्कीच आपला अपमान करायचा नसेल, पण.. मी नंतर बोलेन तिच्याशी.’
‘नको, नको,’ अरिष्टानेमी हात उंचावून खात्री दिल्यासारखे म्हणाले, ‘मी तिला सांगितलं की मला आपणास एकांतात भेटायचं आहे.’
‘अर्थात रहाण्याची व्यवस्था आपणास, विशेषतः गुरु विश्वामित्र आणि अयोध्येच्या राजकुमारांना समाधानकारक वाटली असेल अशी मी आशा करते.’
अरिष्टानेमी हसले. सीता लगेच मुद्यावर आली होती. ते म्हणाले, ‘गुरु विश्वामित्र राजवाड्यातील त्यांच्या नेहमीच्या खोलीमध्ये आरामात आहेत. पण राजकुमार राम आणि राजकुमार लक्ष्मणाच्या रहाण्याची व्यवस्था पोळा वस्तीत करण्यात आली आहे.’
‘पोळा वस्तीत!’ सीतेला आश्चर्याचा धक्काच बसला.
समीचीला वेड लागलंय की काय‘?!
तिच्या मनात उमटलेले विचार जणू ऐकू आल्यासारखे अरिष्टानेमी म्हणाले, ‘खरं सांगायचं तर, राजकुमारांनी तेथे रहावं अशी खुद्द गुरुवर्यांचीच इच्छा होती.’
सीतेनं शरणागती पत्करल्यासारखी हात उंचावून आपली नाराजी प्रकट केली. तिने विचारलं, ‘पण का? ते अयोध्येचे राजकुमार आहेत. राम अयोध्येचा वारस आहे. हे सर्व अयोध्येला अपमानकारक वाटेल. यामुळे मिथिलेवर संकट ओढवू नये अशी माझी इच्छा आहे...’
‘राजकुमार रामला यात आपला अपमान झाला असं काही वाटत नाही,’ सीतेचं बोलणं मध्येच तोडत अरिष्टानेमी म्हणाले, ‘तो एक प्रगल्भ विचारांचा आणि समजुतदार पुरुष आहे. मिथिलेतील त्याचं आगमन आपल्याला गुप्त राखायचं आहे, निदान सध्या तरी. आणि काही दिवस तू सुद्धा त्याला भेटणं टाळायला हवंस.’
आता मात्र सीतेला शांत रहाणं अशक्य झालं. ‘गुप्त? अरिष्टानेमी, त्याला स्वयंवरात भाग घ्यायचा आहे. त्यासाठीच तो इथे आला आहे. होय ना? हे आपण कसं गुप्त राखणार?’
‘एक समस्या आहे, राजकुमारी.’
‘कोणती समस्या?’ सीतेनं विचारलं.
अरिष्टानेमींनी सुस्कारा सोडला. काही क्षण ते गप्प राहिले. मग कुजबुजले, ‘रावण.’
‘तू त्याला अजून भेटली नाहीस हा शहाणपणाच म्हणायला हवा,’ समीची म्हणाली.
सीता आणि समीची राज्याच्या शस्त्रास्त्र भांडारातील शाही विभागात होत्या. त्या विभागात राजघराण्यातील व्यक्तींच्या आवडीची खाजगी शस्त्रास्त्रं ठेवण्यासाठी एका विशेष खोलीची व्यवस्था केलेली होती. सीता एका खुर्चीवजा आसनावर बसली. लक्षपूर्वक ती रुद्रदेवांच्या धनुष्याला
पिनाक
ला तेल पाजत होती.
अरिष्टानेमींशी झालेल्या बोलण्यानंतर सीतेला वाईट वाटत राहिलं. खरं सांगायचं तर, मलयपुत्रांच्या एकूणच आखणीबद्दल तिच्या मनात संशय निर्माण झाला होता. ते आपल्या विरुद्ध जाणार नाहीत हे तिला ठाऊक होतं. त्यांच्या एकूण योजनेत तिचं असणं अत्यावश्यक होतं, पण रामचं असणं महत्वाचं नव्हतं.
ज्यांच्याशी बोलता येईल असं कुणी असायला हवं होतं. हनुदादा किंवा राधिका इथे असायला हवे होते...
सीतेनं मान वर करून समीचीकडे पाहिलं. मग ती चमकावलेल्या
पिनाक
ला पुन्हा तेल पाजू लागली.
समीचीला थोडं अस्वस्थ वाटू लागलं. तिच्या मनात काहीतरी संघर्ष चालला असावा असं वाटत होतं. ती म्हणाली, ‘मला तुला काही सांगायचं आहे. इतर लोक काय म्हणतात याची मला पर्वा नाही, पण खरी गोष्ट ही आहे की रामचा जीव धोक्यात आहे. काहीही करून तुला त्याला परत पाठवायला हवं.’
धनुष्याला तेल पाजणं बंद करून सीतेनं नजर वर उचलून समीचीकडे पाहिलं. मग ती म्हणाली, ‘तो जन्मला त्या दिवसापासूनच त्याचं जीवन संकटात आहे.’
समीचीनं नकारार्थी मान हालवत म्हटलं, ‘नाही, मला असं म्हणायचंय की, आता त्याचा जीव खरोखर संकटात आहे.’
‘खोटं संकट म्हणजे काय समीची? असं काहीही नसतं...’
‘काय लपवतेस तू, समीची?’
समीचीनं एकदम स्वतःला सावरलं. मग ती म्हणाली, ‘काही नाही, राजकुमारी’
‘गेल्या काही दिवसांपासून तू अगदी विचित्र वागतेयस!’
‘माझं सोड, मी महत्वाची नाहीय. ज्याच्याशी तुझा संबंध नाही असं कधी मी काही तुला सांगितलंय का? कृपया माझ्यावर विश्वास ठेव. शक्य असेल तर रामला परत पाठव.’
सीता काही बोलली नाही
पिनाक
कडे पाहिलं आणि ती पुन्हा त्याला तेल पाजण्याच्या कामी लागली.
रुद्र देवा, काय करायचं ते सांग मला...
‘माझ्या मिथिलावासियांनी खरोखर टाळ्या वाजविल्या का?’ सीतेनं विचारलं. अविश्वासानं तिचे डोळे विस्फारले गेले होते.
अरिष्टानेमी नुकतेच सीतेच्या खाजगी कार्यालयात आले होते. त्यांनी एक अपेक्षित, पण खळबळजनक बातमी आणली होती. सीतेच्या स्वयंवरात भाग घेण्यासाठी रावण आला होता. दंतकथा बनलेलं त्याचं उडणारं वाहन
पुष्पक विमान
नुकतंच नगराबाहेर उतरलं होतं. त्याच्यासोबत त्याचा भाऊ कुंभकर्ण होता. आणि त्याचे काही महत्वाचे अधिकारीसुद्धा सोबत होते. लंकेच्या दहा हजार सैनिकांची तुकडी रावणाच्या शरीररक्षकांच्या रूपात पायी चालत येऊन थडकली होती. त्यांनी नगराबाहेर आपला तळ ठोकला होता. त्यामुळे त्या ठिकाणाला लष्करी छावणीचं स्वरूप प्राप्त झालं होतं.
नगराबाहेरील खंदकापलीकडे रावणाचं पुष्पक विमान उतरलं तेव्हा मिथिला नगरीतील नागरिकांनी ते दृश्य पाहून टाळ्या वाजवल्याचं ऐकून सीतेला गंमत वाटली.
‘बहुतेक सामान्य लोक जेव्हा पहिल्यांदा पुष्पक विमान पाहातात तेव्हा टाळ्या वाजवतात, सीता,’ अरिष्टानेमी म्हणाले, ‘ते महत्वाचं नाही. महत्वाचं हे आहे की, आपल्याला रामला परत जाण्यापासून परावृत्त करायला हवंय.’
‘राम परत जातोय? का? मला वाटलं त्याला रावणाला दाखवून द्यायचं असेल की...’
‘अजून त्याच्या मनाची तयारी झालेली नाहीय. पण मला वाटतं, लक्ष्मण परत जाण्याची गोष्ट आपल्या मोठ्या भावाच्या गळी उतरवेल,’ अरिष्टानेमी म्हणाले.
‘म्हणजे, मला लक्ष्मणाच्या परोक्ष त्याच्याशी बोलावं लागेल असं तुम्हाला सुचवायचं आहे का?’ सीतेनं विचारलं.
‘होय,’ अरिष्टानेमी म्हणाले.
‘तुम्ही त्याच्याशी...’
‘हो, मी बोललोय त्याच्याशी आधीच. पण माझ्या बोलण्याचा त्याच्यावर फारसा परिणाम झाला आहे असं मला वाटत नाही.’
‘त्याच्याशी बोलू शकेल असं इतर कुणी आहे का?’
डोकं नकारार्थी हालवत अरिष्टानेमी म्हणाले.
‘पण...’
‘आता सगळं काही तुझ्या हातात आहे, सीता,’ अरिष्टानेमी म्हणाले, ‘गुरु विश्वामित्रसुद्धा रामला थांबवू शकतील असं वाटत नाही. आता सगळं काही तुझ्य हातात आहे, सीता,’ अरिष्टानेमी म्हणाले, ‘राम निघून गेला तर आपल्याला हे स्वयंवर रद्द करावं लागेल.’
रुद्र देवा! पण मी त्याला असं काय सांगून थोपवू शकेन?
याआधी आम्ही कधी भेटलेलोही नाही. मी असं त्याला काय सांगू शकणार आहे जे ऐकून तो स्वयंवरासाठी थांबायचा निर्णय घेईल?
‘हे मी कसं सांगू? मला अजिबात कल्पना नाही.’
‘धन्यवाद,’ हसत आणि डोकं हालवत सीता म्हणाली.
‘सीता, हे जरा अती होतंय हे मला समजतंय...’
‘ठीक आहे, मी करेन प्रयत्न.’
मला काहीतरी करावंच लागेल. निघेल काही मार्ग
पण अरिष्टानेमी नेहमीपेक्षा जरा जास्तच तणावात वाटले. म्हणाले, ‘आणखीनही काही आहे, सीता....’
‘आणखी काय आहे?’
‘परिस्थिती थोडी जटिल होणार आहे.’
‘ते कसं काय?’
‘रामला इथे एकप्रकारे ... कट करून आणलं गेलंय...’
‘काय?’
‘त्याला एवढंच सांगितलं गेलंय, की, गुरु विश्वामित्रांसोबत एका महत्वाच्या कामगिरीवर त्याला मिथिला नगरीत जायचं आहे. महाराज दशरथांनी त्याला गुरु विश्वामित्रांच्या प्रत्येक आज्ञेचं पालन करायला सांगितलं आहे. म्हणूनच इथे येण्यास तो नकार देऊ शकलेला नाहीय.... इथे येऊन त्याला स्वयंवरात भाग घ्यायचा आहे याची त्याला कल्पना दिली गेलेली नाहीय. मिथिला नगरीत पोहोचेपर्यंत त्याला या गोष्टीची कल्पना नव्हती.’
सीतेला धक्का बसला. ‘गंमत करताय ना तुम्ही माझी?’ तिने विचारलं.
‘पण शेवटी, काही दिवसांपूर्वीच, त्याने स्वयंवरासाठी होकार दिलाय. त्या दिवशी बाजारात जेव्हा तू त्या चोर पोराला वाचविण्यासाठी मारामारी केलीस त्याच दिवशी...’
दोन्ही हातांनी सीतेनं डोकं पकडलं आणि डोळे बंद केले. ती म्हणाली, ‘मलयपुत्र असं करतील असं मला वाटलं नव्हतं.’
‘शेवट चांगला झाला की तो गाठण्यासाठी अवलंबिलेला मार्ग ही योग्य ठरतो, सीता.’
‘परिणाम मी भोगावेत अशी अपेक्षा असेल तर.. नाही!’
‘पण नंतर त्यानं स्वयंवरात भाग घ्यायला होकार दिला ना?’
‘रावणाच्या आगमनाच्या आधीची ही गोष्ट आहे, हो ना?’
‘हो.’
डोळे गरगर फिरवून सीतेनं त्यांना जाणवून दिलं की परिस्थिती पुन्हा बदललीय.
हे रुद्रदेवा, मदत करा मला!