The Oath Of The Vayuputras (Marathi)
शिव आपल्या सैन्याची जुळवाजुळव करत आहे. तो पंचवटी या नागांच्या राजधानीत जातो आणि अखेरीस त्याला सैतानाचा शोध लागतो. ज्या पुरुषाच्या नुसत्या नावानेच बलाढ्य योद्ध्यांनाही कापरे भरते, त्या आपल्या खऱ्या शत्रूच्या विरोधात पवित्र युद्ध करण्यासाठी नीळकंठ तयारी करतो. तुंबळ युद्धांच्या मालिकेच्या उद्रेकाने भरतवर्ष हादरून जाते. कित्येक जण मृत्यू पावतात. मात्र कितीही किंमत मोजावी लागली तरीही शिवाला कदापि अपयश येता कामा नये. त्याला ज्यांनी कधीच साहाय्य देऊ केलेले नसते, त्या वायुपुत्रांकडे तो अत्यंत नैराश्यग्रस्त परिस्थितीत जातो. तो यशस्वी होतो का आणि सैतानाला प्रतिबं ध करण्याची खरी किंमत कोणती असतेॽ भरतवर्षासाठी ती काय असते आणि शिवाच्या आत्म्याला कोणती किंमत मोजावी लागते उत्तम खपाच्या शिव त्रिसूत्रीमधील या तिसऱ्या पुस्तकामध्ये या गूढ प्रश्नांची उत्तरे सापडतील.