[Ram Chandra 02] • Sita (Marathi) · Warrior of Mithila (Ram Chandra Series) (Marathi Edition)
राम चंद्र मालिके च्या भव्य महायात्रेच्या मालिकेतील अमीश यांचं नवं पुस्तक: एक रोमांचक साहसकथा. या कथेत भेटा एका दत्तक पुत्रीला, जी पुढे बनते भारताची पंतप्रधान. त्याही नंतर बनते-देवी. ख्रिस्तपूर्व ३४०० सालातील भारत विभाजन, असं तोष, गरिबीनं त्रस्त आहे. लोक राज्यकर्त्यांचा तिरस्कार करतात. भ्रष्ट आणि स्वार्थी उच्चभ्रूंचाही ते तिरस्कार करतात. फक्त ठिणगी पडण्याचा अवकाश. गोंधळ माजणं यात आहे. बाहेरील जग या विभाजनाचा फायदा घेतं. दिवसेंदिवस लंकेचा राक्षस राजा रावण अधिकाधिक शक्तिशाली होत आहे. दुर्दैवी सप्तसिंधू प्रदेशात तो आपले दात खोलवर रुतवत आहे.
माळावर एक बेवारस मुलगी मिळते. खुनशी लांडग्यांच्या टोळीपासून एक गिधाड तिचं रक्षण करतं. शक्तिहीन आणि उपेक्षित मिथिलेचा राजवंश तिला दत्तक घेतो. ही मुलगी मोठेपणी काही वेगळं करेल असं कुणालाच वाटत नाही. पण सगळेच चूक ठरतात. कारण ती कु णी सामान्य मुलगी नाही. ती आहे सीता. राम चंद्र मालिके तील हे दसरं पुस्तक आहे. हे पुस्तक तुम्हाला मागे नेतं –अगदी सुरुवातीच्याही मागे.